Dussehra | ayushnaphadeblogs | Abhishek budhwat | Ayush Naphade
आज खरच वाटल आपल घर...आपला बुलढाणा... आता नाही ...इथे आल्यावर मित्र-मैत्रिणी खप झाल्या पण कितीही मोठा मित्रपरिवार असला तर सणाला मात्र घरची आठवण येतेच.. आठवत अजून मला ते समोरच्या पाटील काकूच्या वाड्यातून आपट्याची पाने कसे तोडायची सगळी गल्लीतली मुलं.. दसऱ्याच्या एक दिवस आधी S2K मध्ये खरेदी करायची ......दिवसभर तसी काहीच काम नसायचं... पण रात्री फिरण्याच्या घ्या उत्सुकतेमध्ये दिवस पण निघून जायचा...सगळे ठरवायचं रात्री सगळे मित्र कुठे भेटणार...आई तर दररोज सारखा स्वयंपाक करताना दिसत होती तिला सुट्टी नसायधी... हा पण 'पपा आजच्या दिवशी बसले सगळ्यांनसोबत.. यांना असायची सुट्टी...दसरा नवरात्रीत गी मध्ये देवी बसवायचे सगळे...आज पण त्या देवीचे दर्शन घायचे हे ठरलेलं गलीतील सगळ्यांचा...५-६ वाजेपासून बहिणीची तयारी चालू व्हायची...
आमची घराच्या बाहेर पडायच्या १० mln आधी... तयारी करतानाच मित्रांचे फोन वर फोन येतात...बुलढण्याच्या डोंगरावर नवरात्रीत एक वेगळाच माहोल बनलेला असतो 'चिखली रोड' वर... मोठया देवीची जत्...इथे तर दसन्याच्या दिवशी संध्याकाळी वेगळाच...सौंदर्य दिसते बुलढण्याचं] खास तयारी याच्यासाठीच चालते... ७ ला घराच्या बाहेर पडायचं घरातील सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन गनीतल्या मोठ्यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घ्यायचा.... मित्रांची गळेभेट घ्यायची...गावीतील देवीच्या दर्शनाला जायचं...यावेळी शुभम सोबतच असायचा...'पाळणाघराजवळ' सगळे मित्र भेटनार मग चालू व्हायचा बुलडाण्याच्या प्रत्येक गनीतील दसरा...सगळे शाळा कॉलेज ची मित्रा गाडी काढायची प्रत्येक शिक्षकाच्या घरी जायच....शिक्षक पण आजपण आम्हाला लहान समजून चॉकलेट द्यायचे ...शहरातील ओळखीच्या घरी जायचं... चिखली रोड वरील देवी च्या दर्शनासाठी सगळ्यात शेवटी कारण तिथे किती वेळ जाईल हैं सांगितले नाही जात..ज्यांचं जमलेलं ते भेटणार बाकीचे त्यांना company यायला तयारच..मित्रच ते.. जत्रेतून काहीतरी कर्णकर्कश आवाजच वाजवायला घ्यायचा आणि गाडीवर वाजवत फिरायचं...हा पण आजसुद्धा जत्रेत 'खाकीतला माणुस दिसतच होता त्याला सुट्टी नाही.देवीचं दर्शन घेतलं की सगळं संपत आल ..मग घरी जायचा मन नव्हत होत..
शेवटचा stop 'चिंचोले चौकबुलढण्याची marine drive शेवटी पुन्हा happy दसरा म्हणून घरी जायचा.आता पण आठवण येते त्या दिवसाची..दसरा आता आलो इथे दूर शेगाव आलो आता ते दिवस ४ वर्ष पण नाही परत येणार आणि engineering म्हणल्यावर जॉब मुंबई -पुणे पण परत नाही बुलढाणा त्यामुळे ४ वर्षाच की अक्खा आयुष्य मी आठवण काढणार या दिवसाची हे नाहीमाहीत पण आज इकडे होस्टेल ला काहीच नव्हतं बदललेला सगळं तेच सारखा होता इथे एक दिवसआधी S2K मध्ये नाही गेलो.देवीच्या दर्शनासाठी पण नाही गेलो बाबांना सुट्टी असून पण आज त्यांच्यासोबत नाही ...आई ला पण स्वयंपाक करताना नाही बघितले.. दीदी ची तयारी ३ तास आधी नाही चालू झाली...हा पण इथली पण आठवण ४ वर्षानंतर येणारच...आता तर NJOY करतोय सगळ..मला इथे कधीच योर नाही झाला .पण आज पहिल्यांदा मन कसतरी होतय....बस इतकच लिहायच होत.

Comments
Post a Comment