Dil Bechara | ayushnaphadeblogs | Ayush Naphade
आज ची सकाळ आधींसारखी नव्हती,आधी उठताना चेहऱ्यावर आळस असायचं पण आज चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता,आतुरता होती, जणू भावनात्मक आठवणीने झालेली सकाळ होती,त्याला तसं कारण पण होतं,आज 24 जुलै,कोणीं जीवनातून गेल्यावर परत येण्याचं आनंद होता, हा आनंद केवळ माझ्या चेहऱ्यावर नव्हे तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनच्या चेहऱ्यावर होता,होता नाही हो आहेच... आज दिवस भर मन भूतकाळाच्या आठवणीत म्हणजे त्याच्या आठवणीत रमून गेले होते,म्हणजे अगदी सुरवातीला 2013 जेव्हा त्याच सिनेमा प्रदर्शित झाला,वर्ग सुरू होता अन मित्र हळूच बोलला,' kai po che ' बघितला का तू, मी नाही म्हणालो ,मग तो अतिशय उत्साही आवाजाने म्हणाला की तू मानव चा सिनेमा नाही बघितलं, मला आश्चर्य वाटलं,मन उदास झाले,पण काही दिवसाने तो सिनेमा मी बघितला,सुरवातीला मजा अली पण मात्र शेवट डोळे ओले करून झाला.. निरागस मनात प्रश्नांची खळबळ सुरू झाली,अभिनेता शेवटी का मरण पावला? दुसऱ्या साठी जागून कुणी स...